माळशिरस तालुक्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा.
माळशिरस
महाराष्ट्र विकास सेना पक्षाची तहसीलदार यांच्याकडे मागणी.
महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साहेब साठे, प्रदेश सचिव अनिल साठे, प्रदेश संपर्कप्रमुख बाळासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विकास युवा सेनेचे जिल्हा संघटक साईराज अडगळे यांनी माळशिरस तालुक्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशा मागणीचे निवेदन माळशिरस तहसीलदार यांना देण्यात आले ते निवेदन खैरे साहेब यांनी स्वीकारले. यावेळी महाराष्ट्र विकास सेनेचे प्रदेश सचिव अनिल साठे महाराष्ट्र विकास सेना नेते बापूसाहेब वाघमारे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे, माळखांबी शाखा मारुती साठे इत्यादी उपस्थित होते.