जळगावात रात्री हवेत गोळीबार; दोन ताब्यात
जळगाव : मद्यपान करीत असताना वाद
होऊन दोन तरुणांनी इतर तरुणांवर पिस्तूल रोखत हवेत गोळीबार केला. ही घटना रविवारी (१७ मे) रात्री १०:३० वाजता कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धिविनायक चौकात घडली. या प्रकरणी दोन तरुणांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कोल्हे हिल्स परिसरात दोन तरुण दारू पिण्यासाठी आले होते. त्यांचा सिद्धिविनायक चौकातील एका किराणा दुकानदारासोबत पैशांवरून वाद झाला व तरुणांनी हवेत गोळीबार केला. संतप्त झालेल्या नागरिकांनी गोळीबार करणाऱ्यांना चोप दिला.
या मध्ये एकजण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.