पैलवान महेंद्र गायकवाड ठरले ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते...!
पैलवान महेंद्र गायकवाड ठरले ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते
पाचोरा प्रतिनिधी
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)दि.१७ मे२०२६
सातारा येथे पार पडलेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे पैलवान महेंद्र गायकवाड यांनी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यावर मात करत हिंदकेसरी किताबावर आपले नाव कोरले.
यापूर्वी तीन वेळा उप-महाराष्ट्र केसरी किताबावर समाधान मानावे लागलेल्या महेंद्र गायकवाड यांनी यंदा आपल्या ताकदीचा आणि कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार सादर करत हिंदकेसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.
अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित होती. मात्र, पृथ्वीराज मोहोळ हे जखमी असल्यामुळे पंचांनी महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित केले. त्यामुळे महेंद्र गायकवाड यांनी प्रथमच हिंदकेसरी किताब पटकावत आपल्या कुस्ती कारकिर्दीत मानाचा तुरा रोवला.