logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पोलीस भरती परीक्षेत यश संपादन केलेल्या तरुण व तरुणींचा सत्कार सोहळा...!

पोलीस भरती परीक्षेत यश संपादन केलेल्या तरुण व तरुणींचा सत्कार सोहळा करण्यात आला.
पाचोरा प्रतिनिधी
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)दि.१७ मे २०२६
मा.ना गिरिष भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज भाजपा जामनेर पश्चिम मंडलाच्या वतीने नुकत्याच आलेल्या पोलीस भरती परीक्षेत यश संपादन केलेल्या तरुण व तरुणींचा सत्कार सोहळा भवानी माता मंदिर हॉल सुनसगाव फाटा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला
यावेळी पश्चिम भागातील पोलीस भरतीत यश मिळविलेल्या 110 तरुण व तरुणी व त्यांच्या पालकांचा प्रशस्तीपत्र, शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला, ग्रामीण भागात प्रथमच झालेल्या या आगळया वेगळ्या कार्यक्रमामूळे उपस्थितानी समाधान व्यक्त केले
यावेळी भाजपा जेष्ठ नेते जितू काका पाटील, जामनेर उपनगराध्यक्ष डॉ प्रशांत दादा भोंडे, मा तुकाराम आप्पा निकम, शेखर दादा काळे, अण्णा दादा पिठोडे प्रा शरद पाटील सर, जामनेर शहर मंडल अध्यक्ष गोलू झाल्टे, दिनू शेठ, सुभाष पाटील, नाना पाटील, बापू काळबैले, सोपान पाटील,नाना भोजने, दत्तू साबळे, प्रसाद पाटील, सुभाष वाघोडे, जयवंत माळी , विनोद पाटील,विनोद कोळी यांचेसह पदाधिकारी व कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सर्वांचे आभार कमलाकर पाटील, अध्यक्ष भाजपा जामनेर पश्चिम, हर्षल चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष, रवी हडप, तालुका उपाध्यक्ष, निवृत्ती पाटील, युवा मोर्चा उपाध्यक.

3
275 views

Comment