आठ वर्षीय कृष्णा आगिवले या निष्पाप मुलाचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
शहापूर तालुक्यातील डोळखांब वन परिक्षेत्रात गेल्या अनेक दिवसापासून नरभक्षक बिबट्याने दहशत निर्माण केली होती. दरम्यान लाद्याच्या वाडी येथील आठ वर्षीय कृष्णा आगिवले या निष्पाप मुलाचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला असून गेल्या अनेक दिवसापासून निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सदर बिबट्याने डोळखांब परिसरातील अनेक गावांमध्ये वारंवार दर्शन देत नागरिकांमध्ये भीती निर्माण केली होती विशेषता लहान मुले महिला आणि शेतकरी वर्गामध्ये मोठी दहशत पसरली होती काही दिवसापूर्वी लाद्याच्या वाडी येथील जंगलात रानमेवा गोळा करण्यासाठी गेलेल्या कृष्णा आगिवले याआठ वर्षे मुलावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला ठार केले होते या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागा विरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती तसेच ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटना आणि श्रमजीवी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनीही घटनास्थळी भेट देऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते यावेळी काम करता येत नसेल तर खुर्ची सोडा असा इशाराही दिला होता व बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची सूचनाही केली होती. नागरिकांच्या वाढत्या दबावानंतर वन विभागाने विशेष पथके तयार करून परिसरात पिंजरे ट्रॅप कॅमेरे आणि रात्री गस्त वाढवली होती अखेर सलग अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतर संबंधित बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समोर येतात ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले मात्र या घटनेत निष्पाप कृष्णाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वनविभागाकडून पकडण्यात आलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून पुढील निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या
मार्गदर्शनाखाली घेतला जाणार असलची माहिती सूत्रांनी दिली. तसेच नागरिकांनी मुलांवर लक्ष ठेवणे आणि वनक्षेत्रालगत सतर्क राहण्याचे आव्हान वनविभागाकडून करण्यात आले आहे.