logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नगर रोड चाराठा फाटा, बीड येथे भीषण अपघात

नगर रोड चारठा फाटा, बीड येथे भीषण अपघात

आज दुपारच्या सुमारास बीड शहरातील नगर रोड चारठा फाटा परिसरात एक मोठा अपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगातील एका Eicher टेम्पोने नियंत्रण गमावून दोन सिटी बस आणि रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाला जोरदार धडक दिली.

अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. घटनेनंतर काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.

घटनास्थळ: नगर रोड, चारा ठा फाटा, बीड
प्रशासनाकडून तपास सुरू

स्थानिक नागरिकांनी अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असून ही घटना शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

31
3037 views

Comment