logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बीडमध्य ; सासरच्या मंडळींकडून धारदार तलवारीसह घरात घुसून तरुणावर हल्ल्याचा आरोप

बीडमध्ये मध्यरात्री थरार; सासरच्या मंडळींकडून धारदार तलवारीसह घरात घुसून तरुणावर हल्ल्याचा आरोप

बीड : शहरातील बालेपीर बांगर नाला गोरे बस्ती, ईदगाह बाजू परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेख समीर शेख शमशेर या तरुणाचा आरोप आहे की, रात्री अंदाजे १२:०० वाजण्याच्या सुमारास त्याच्या सासरचे लोक त्याला मारण्यासाठी त्याच्या घरी आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर व त्याच्या पत्नीमधील कौटुंबिक वादाचे प्रकरण यापूर्वी महिला मंडळात गेले होते. त्यानंतर महिला मंडळाच्या सल्ल्यानुसार समीर हा पत्नी व मुलासोबत भाड्याच्या घरात वेगळा राहत होता.

दरम्यान, रात्री उशिरा समीरच्या घरी त्याची सासू सुरैय्या, मेहुणे याहिया आफ्रिदी, आफ्रिदी, आफ्रिदीची पत्नी तंजीला तसेच त्यांच्यासोबत आणखी दोन मित्र आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधितांकडे धारदार तलवार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

समीरच्या म्हणण्यानुसार, संबंधितांनी जबरदस्तीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताच शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तसेच त्याच्याकडील काही रोख रक्कमही जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर जखमी अवस्थेत समीरला रात्रीच जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच या घटनेसंदर्भातील काही व्हिडिओ क्लिप्स देखील समोर आल्याची माहिती मिळाली आहे.

समीरने संबंधितांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील काळात स्वतःच्या जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

66
2538 views

Comment