logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भंडारा: अंकुश मुळे यांना बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड प्रदान

भंडारा: द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल भंडारा येथील प्राचार्य श्री. अंकुश ए. मुळे यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार डॉ. उमेश रस्तोगी (संचालक, नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई), डॉ. गौतम बेंगळे (विभागीय संचालक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक), डॉ. शैलेश कुलकर्णी (संचालक, डॉ. होमी भाभा फाउंडेशन, मुंबई), डॉ. आस्मा फातिमा (संचालिका, डॉ. होमी भाभा फाउंडेशन, मुंबई) तसेच डॉ. सुनील कुलकर्णी (परीक्षा नियंत्रक, डॉ. होमी भाभा फाउंडेशन, मुंबई) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न, उत्कृष्ट शैक्षणिक नेतृत्व आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

या गौरवामुळे द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल परिवाराचा अभिमान वाढला असून शाळेच्या अध्यक्षा डॉ. सौ. ज्योती अय्यर, सचिव डॉ. सुरज अय्यर तसेच संचालक डॉ. नंदलाल चौधरी यांनी श्री. अंकुश मुळे यांचे अभिनंदन केले आहे. पालक व विद्यार्थ्यांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली शाळा भविष्यातही यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

7
1062 views

Comment