पोलिस पाटलाच्या घरातून सव्वा लाखाचा ऐवज लांबविला
जळगाव : कुटुंबीयांसह आडगाव येथे
-
मूळ गावी गेलेले पोलिस पाटील धर्मराज रामदास बाविस्कर (४०, रा. गजानन नगर, जुना आसोदा रोड) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह दागिने असा एकूण १ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि. १५ मे रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी बाविस्कर यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. तसेच एका कपड्याच्या बॅगेत ठेवलेले रोख १५ हजार रुपये, १० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, ५ ग्रॅमची अंगठी असा एकूण १ लाख २७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.