logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*प्रश्न विचारणाऱ्यांची भीती नेमकी कोणाला?*

*प्रश्न विचारणाऱ्यांची भीती नेमकी कोणाला?*

लोकशाहीमध्ये सत्तेपेक्षा मोठं काही असेल, तर ते म्हणजे जनतेचा आवाज. पण दुर्दैवाने आज परिस्थिती अशी निर्माण होत आहे की, प्रश्न विचारणाऱ्या तरुणांकडे संशयाने पाहिले जात आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार, पेपरफुटी, प्रशासनातील अनियमितता किंवा जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या युवकांना नकारात्मक, रिकामटेकडे किंवा झुरळ अशा शब्दांत हिणवण्याची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. ही केवळ भाषेची घसरण नाही, तर लोकशाही मूल्यांच्या अधोगतीची गंभीर चेतावणी आहे.

प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही. उलट, तो लोकशाहीचा आत्मा आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. हे स्वातंत्र्य केवळ सत्तेची स्तुती करण्यापुरतं मर्यादित नाही, तर चुकीच्या धोरणांवर जाब विचारण्यासाठीही आहे. जेव्हा एखादा तरुण नोकरीबाबत प्रश्न विचारतो, RTI दाखल करतो, पत्रकार भ्रष्टाचारावर लेखणी चालवतो किंवा सोशल मीडियावर अन्यायाविरोधात आवाज उठवतो, तेव्हा तो लोकशाही अधिक मजबूत करत असतो.

इतिहास साक्ष देतो की, सत्तेला प्रश्न विचारणारे लोक नेहमीच अस्वस्थ करणारे ठरले आहेत. कारण प्रश्न हे केवळ व्यवस्थेवर नसतात, तर सत्तेच्या अहंकारावर थेट प्रहार करत असतात. म्हणूनच अनेकदा सत्ताधाऱ्यांकडून प्रश्न विचारणाऱ्यांची टिंगल केली जाते, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न होतो. मात्र, हे विसरता कामा नये की समाजातील अनेक घोटाळे, अन्याय आणि भ्रष्टाचार हे RTI कार्यकर्ते, पत्रकार आणि जागरूक तरुणांमुळेच उघडकीस आले.

आज देशातील लाखो तरुण उच्च शिक्षण घेऊन रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. स्पर्धा परीक्षांमधील गोंधळ, भरती प्रक्रियेतील विलंब आणि वाढती असुरक्षितता यामुळे युवकांमध्ये नैराश्याचं वातावरण आहे. अशा वेळी त्यांच्या वेदनांना समजून घेण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवणं हे कोणत्याही जबाबदार नेतृत्वाला शोभणारं नाही.

लोकशाहीमध्ये सर्वात धोकादायक परिस्थिती ती नसते, जेव्हा लोक प्रश्न विचारतात; तर ती असते, जेव्हा सत्तेला प्रश्न विचारणारे लोकच नकोसे वाटू लागतात. कारण ज्या दिवशी समाजाने प्रश्न विचारणं थांबवलं, त्या दिवशी लोकशाही केवळ कागदावर उरेल.

संपादक विजय सूर्यवंशी
शिवधर्म वृत्तपत्र

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

2
89 views

Comment