logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बीड शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात साऊ एकल महिला समितीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

बीड शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात
साऊ एकल महिला समितीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

बीड, ता. १६ : - ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावर विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व इतर एकल महिलांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेने केले आहे. त्याच धर्तीवर बीड शहरातील एकल महिलांचेही सर्वेक्षण करून त्यांना रोजगार व स्वावलंबनासाठी मदत करावी, अशी मागणी साऊ एकल महिला समिती, महाराष्ट्र राज्य, बीड जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली.
या मागणीसंदर्भात समितीचे मार्गदर्शक प्राचार्य डी. जी. तांदळे, जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे तसेच मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांनी बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शहरातील अनेक एकल महिला आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जात असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्वेक्षणाच्या माध्यमातून संबंधित महिलांना रोजगार मेळावे, कौशल्य विकास प्रशिक्षण, बचत गट, उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देता येऊ शकतो. महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरेल, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शासनाच्या २९ मार्च २०२२ च्या निर्णयानुसार महिला व बालकल्याणासाठी निधी खर्च करण्याची तरतूद आहे. त्यातील काही निधी एकल महिलांच्या रोजगार, व्यवसाय आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
बीड शहरातील झोपडपट्ट्या व विविध परिसरांतील गरजू एकल महिलांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे बाजीराव ढाकणे यांनी सांगितले.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

6
78 views

Comment