logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी भंडारा सोबत शिक्षणाधिकारी माध्यमिक सहविचार सभा संपन्न. -शिक्षण मंत्री दादा भुसेना निवेदन

*भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी भंडारा सोबत शिक्षणाधिकारी माध्यमिक सहविचार सभा संपन्न.
-शिक्षण मंत्री दादा भुसेना निवेदन

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी भंडारा जिल्हा अध्यक्ष कैलास कुरंजेकर व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी सोबत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा सोबत जिल्ह्यातील व राज्यातील शिक्षण क्षेत्रातील तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या व इतर अनुषंगिक विषयाबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयात सहविचार सभा संपन्न झाली. सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
प्रामुख्याने शालार्थ प्रणालीत डिजिटल अभिलेख अपलोड करणे, त्यात प्रथम नियुकी आदेश, प्रथम मान्यता आदेश व रुजू अहवाल मूळ प्रत आदी अभलेख समाविष्ट आहेत. ज्या शाळेत किंवा शिक्षका जवळ उल्लेखीत अभिलेख उपलब्ध आहेत त्या बहुतेक शाळांनी व शिक्षकांनी अपलोड केले आहे. परंतु काही शाळा व शिक्षकांजवळ उपरोक्त अभि लेख मूळ प्रत उपलब्ध नाही त्यामुळे त्यांचे वेतन थांबविण्यात आले ही बाब गंभीर असल्याचे सभेत निदर्शनास आणून दिले. अश्या परस्थितीत ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा, संस्था किंवा शिक्षणाधिकारी कार्यालयात अभि लेख उपलब्ध नसल्यास सेवापुस्तकेतील नोंदी प्रमाणित करून सदर अभिलेख स्वीकार करण्यात यावा याविषयीं चर्चा करण्यात आली. शिक्षणाधिकारी यांनी अनुकूलता दर्शविली पण याविषयी शासन परिपत्रक नाही. राज्यात खाजगी अनुदानित शाळेत शिक्षकेत्तर कर्मचारी नियुक्ती बाबत चर्चा करण्यात त्यावर मॅडमनी सध्या यावर बंदी असल्यामुळे करता येत नाही म्हणाल्या. त्याचप्रमाणे २८ मे २०२५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याना वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय. डी. मंजूर करण्याबाबत,राज्यात खाजगी अनुदानित शाळेत शिक्षकेत्तर कर्मचारी नियुकी परवानगी बाबत व डिजिटल अभिलेख यात सेवापुस्तिकेतील नोंदी स्वीकार करण्याबाबत शासन परिपत्रक काढण्याविषयीं मा. ना. शिक्षण मंत्री शालेय शिक्षण दादाजी भुसे तसेच शालेय शिक्षण राज्यमंत्री मा. ना.डॉ.पंकज भोयर यांना शिक्षणाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील काही शाळेतील कर्मचाऱ्यांना भविष्या निर्वाह निधी व डी. सी. पी. यस च्या पावत्या अर्थिक वर्ष संपल्यावर दिल्या जात नाही. ही बाब शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा ही बाब गंभीर असून या विषयी संबंधितांना आदेशित करण्यात येईल असे आश्वासन मॅडम नि दिले. जिल्यातील काही शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मूळ सेवापुस्तिकेतील नोंदी अद्यावत करून दुय्यम सेवापुस्तिकेत नोंद लिहून देणे आवश्यक बाब आहे, परंतु काही शाळामध्ये तसें होत नही ही बाबा सभेत शिक्षणाधिरी यांच्या लक्षात आणून तेव्हा याविषयी ताबडतोब संबंधितना पत्र काढून आदेशित करण्यात येईल असे शिक्षणाधिकारी यांनी सभेत सांगितलं. भंडारा जिल्ह्यात अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी दर महिन्याला सेवानिवृत्त होतात. त्यांना सेवानिवृत्तीचे व इतर अनुषंगिक लाभ वेळेवर मिळणे आवश्यक व क्रमप्राप्त आहे व त्याकरिता सेवानिवृत्त प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात सहा महिन्याआधी किंवा महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती१९८१ किंवा माध्यमिक शाळांसंहिता नुसार शिक्षणाधिकारी कार्यालयात शाळेतून पाठविणे आवश्यक असते. परंतु काही शाळेतून पाठविण्यास विलंब होत असल्यामुळे त्रुटी पूर्तता करताना विलंब होतो व कर्मचाऱ्याना वेळेवर सेवानिवृत्ती चे लाभ मिळत नाही, ही बबा खेदजनक असल्याचे सभेत शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर मॅडम योग्य कार्यवाही व वेळेवर प्रस्ताव पाठविण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यलयातून परिपत्रक काढून लेखी आदेशीत करण्यात येईल असे सांगितल. या विषयी आघाडी तर्फे शिक्षणाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले.सभेच्या वेळी ज्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, कर्मचारी समस्या घेऊन आलेत त्यावर सुद्धा चर्चा करण्यात आली शक्य तितक्या लवकर निकाली काढण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सभेला शिक्षणाधिकारी

मॅडम यांनी सांगितलं. शेवटी जिल्ह्यातील सर्वांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला झालेच पाहिजे तसेच समायोजन प्रक्रिया आदी बाबतीत सुद्धा सभेत चर्चा करण्यात आली. सभेत रॉयल पब्लिक स्कूल वर्ग ९ सुरु २०२६- २०२७ पासून सुरु करण्याची प्रथम मान्यता व परवानगी, बन्सीलाल लाहोटी विद्यालय मुख्याध्यापक मान्यता आदी उपरोक्त सर्व मुद्यावर सकारात्म चर्चा झाल्यावर शेवटी शिक्षणाधिकारी यांचे आभार मानून सभा समाप्त झाली.सहविचार सभेत सहसंयोजक घनश्याम तरोणे, दिनेश साकुरे, मुरलीधर गोखे, जनता शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद बारई, विकास कुंभरे,प्रांजल मालगावे,लिलाराम लुचे, संदीप चामट व ज्या शाळांचे समस्या होत्या. त्या शाळेतील मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्तित होते.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
78 views

Comment