logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

छत्रपती संभाजीनगर ते पुणे एसटी चालकावर तात्काळ कारवाईची मागणी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्याने छत्रपती संभाजीनगर ते पुणे प्रवास करणाऱ्या एसटी बस चालकावर तात्काळ कारवाई करण्याची तक्रार केली आहे. तक्रारदाराने नमूद केले की, बस चालकाने प्रवासादरम्यान कमीत कमी 10 ते 12 वेळा मोबाईल फोनवर बोलत असताना बेजबाबदार आणि निष्काळजी वर्तन केले. त्याचे संभाषण दुसऱ्या ड्रायव्हरसोबत गाड्यांच्या ओव्हरटेकिंगसारख्या विषयांवर होते, जे प्रवाशांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते.


संघटनेने या गंभीर वर्तनावर सखोल चौकशी करून चालकावर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून कठोर सूचना देण्यात याव्यात, अशीही विनंती करण्यात आली आहे. अन्यथा संघटना आक्रमक भूमिका घेऊन संबंधित विभागाविरुद्ध आंदोलन किंवा निवेदनाचा मार्ग अवलंबेल, अशी नोंद त्यांनी घेतली आहे.

0
0 views

Comment