logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्रेयसीनेच रचला प्रियकराच्या खुनाचा कट! पती -भावासह केली हत्या, मृतदेह ड्रम मध्ये भरून गटारीत फेकला

शहापूर /साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी

मुंब्रा परिसरातील बेपत्ता युवकाची त्याच्या प्रेयसीने पती, भाऊ आणि मित्राच्या मदतीने हत्या करून मृतदेह ड्रममध्ये भरून वसईतील गटारात फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसी आणि तिच्या भावाला अटक केली आहे तर, पती आणि मित्र फरार झाले आहेत. खंडणी मागणी आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने हा कट रचल्याचे तपासात समोर आले.

मुंब्रा परिसरात राहणारा अरबाज मकसुदअली खान हा ३ एप्रिल २०२६ रोजी दादर येथे कामाचे पैसे घेण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. याप्रकरणी त्याचे वडील मकसुद अली खान यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद कुंभार तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि चौकशीच्या आधारे आरोपींपर्यंत धागेदोरे पोहोचवले.

पोलीस उपनिरीक्षक सावंत हे या प्रकरणाचा तपास असताना त्यांनी अरबाजच्या मोबाईल कॉल डिटेल्सचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यामध्ये त्याचा मोबाईल शेवटचा वसई परिसरात सक्रिय असल्याचे समोर आले. तसेच त्याच दिवशी अरबाजची प्रेयसी मेहजबीन हिचेही मोबाईल लोकेशन वसईत आढळून आले. यानंतर पोलिसांनी मेहजबीनला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सखोल चौकशीत तिने धक्कादायक कबुली दिली. मेहजबीन हिने तिचा पती हसन, भाऊ तारीक शेख आणि मित्र मोज्जम तालीब पठाण यांच्या मदतीने अरबाजचा खून केल्याचे कबूल केले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४०, १०३(१), २३८ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरबाजला वसई येथे बोलावून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्याचे हातपाय बांधून प्लास्टिकच्या पाइपने मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरून वालीव पोलीस ठाणे हद्दीतील निर्जन नाल्यात फेकून देण्यात आला, अशी कबुली आरोपीनी पोलिसांना दिली.

मृतदेह शोधला आरोपी मोहम्मद तारीक इकराम शेख याने दाखविलेल्या ठिकाणावरून वालीव, वसई परिसरातील नाल्यात टाकलेला अरबाज खान याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणात मयताची प्रेयसी मेहजबीन खातून इकरान शेख आणि तिचा भाऊ तारीक शेख यांना ७ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मेहजबीनचा पती हसन आणि आरोपी तारीकचा मित्र मुज्ज्म तालीब खान हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

44
1580 views

Comment