विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट
महाराष्ट्र : राज्यातील हवामानात मोठा बदल होत असून भारतीय हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून वाशिम जिल्ह्यात 42.8 अंश सेल्सिअसचा उच्च तापमान नोंदवला गेला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी भागांत उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. खारेपाटण परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने थैमान घातले. भंडारा जिल्ह्यातही सलग तिसऱ्या दिवशी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. लाखनी तालुक्यातील जेवणाला परिसरातील शेतकऱ्यांनी पावसापासून वाचवण्यासाठी मका आणि त्रिपाल जपण्याचा प्रयत्न केला आहे.