logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

डोळखांब वनपरीक्षेत्रात आदिवासी परिषद मोर्चा स्थगित

शहापूर: डोळखांब वनपरीक्षेत्रातील लादेवाडी येथील घटनेबाबत वनविभागाकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली या संघटनेकडून १४ मे २०२६ रोजी डोळखांब वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयात जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. परंतु डोळखांब वनपरीक्षेत्र अधिकारी अजय चव्हाण यांनी परिषदच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करून योग्य ती उपाययोजना करण्याचा लेखी आश्वासन दिल्याने मोर्चाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे कोकण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र मराडे यांनी जर वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद केले नाही आणि अन्य मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन होईल असा इशारा दिला आहे. या वेळी परिषदचे उपाध्यक्ष रविंद्र मराडे, शहापूर तालुका युवा अध्यक्ष हरी हंबीर, तलवाडे ग्रामपंचायत सरपंच अंकुश बरतड, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी वीर, डी. वाय. एस. पी. मिलिंद शिंदे, किन्हवली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक खैरनार साहेब, वनपरीक्षेत्र अधिकारी अजय चव्हाण, पोलीस प्रशासन आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

20
866 views

Comment