३० लाखांसाठी विवाहितेचा छळ
जळगाव : नवीन सराफ दुकान टाकण्यासाठी माहेरून ३० लाख रुपये आणावे यासाठी रोहिणी विशाल दुसाने (३१) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. हा प्रकार २०१९ पासून सुरू होता. या प्रकरणी विवाहितेने पाचोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पतीसह सासरच्या सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाचोरा पोलिस करीत आहेत.