logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*श्रीरामपूरच्या नगराध्यक्षांचा बिलांवरील सहीचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द*

*श्रीरामपूरच्या नगराध्यक्षांचा बिलांवरील सहीचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द*

श्रीरामपूर(*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) श्रीरामपूर नगरपालिकेच्या देयकांवरील(बील)नगराध्यक्षाची सह्या घेण्याचा अधिकार रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांनी जारी केले आहेत. नगरपरिषद प्रशासन शाखेकडून मुख्याधिकारी,श्रीरामपूर नगरपरिषद यांना यासंदर्भात अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्र नगरपरिषद,नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ५८(२)(ब) तसेच सुधारित तरतुदीनुसार नगराध्यक्षांचे वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रण समाप्त करण्यात आले आहे.त्यामुळे नगरपालिकेच्या देयक प्रमाणक व धनादेशांवर नगराध्यक्षांची स्वाक्षरी घेणे हे सुधारित कायद्याच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या संदर्भात जयदीपराज इन्फ्रा प्रा.लि.मुंबई यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर नगरपरिषद प्रशासन शाखेने कायद्यातील सुधारित तरतुदींचा संदर्भ देत हा आदेश निर्गमित केला आहे.
तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार अधिसूचनेनुसार नगराध्यक्षांचे वित्तीय व कार्यकारी अधिकार रद्द करण्यात आले असून मुख्याधिकाऱ्यांनी अध्यक्षांच्या नियंत्रण, निर्देश व पर्यवेक्षणाखाली कामकाज करण्याची पूर्वीची तरतूदही वगळण्यात आली असल्याचे आदेशात नमूद आहे.
या सुधारित तरतुदींमुळे नगराध्यक्षांचे नगरपरिषद व मुख्याधिकाऱ्यांवरील वित्तीय व कार्यकारी नियंत्रण संपुष्टात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असून संबंधित सर्व नगरपरिषदांनी शासनाच्या नव्या नियमांचे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.
दरम्यान नगराध्यक्ष करण ससाणे हे देयक बिलावर नेमके कोणत्या कारणाने सही करण्यास टाळत होते ?किंवा सह्या करण्यास का वेळ घालत होते ? याविषयी पालिका वर्तुळात व श्रीरामपूरच्या राजकारणात,नगरसेवकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे .तर पालिका निवडणुकीत माजी नगराध्यक्ष संजय फंड यांनी करण ससाणेला आम्ही उपनगराध्यक्ष केले होते.मात्र ते काहीही उपयोगाचे ठरले नाही अशी जाहीर टीका केली होती.त्यावर आज नगराध्यक्ष ससाणे यांना देयकाच्या बिलावर सही करणे रद्द झालेबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पत्र पालिकेला प्राप्त झाल्याने फंड यांच्या अकार्यक्षमतेच्या आरोपांना पुष्टी मिळाल्याचे बोलले जात आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
279 views

Comment