logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*मातंग समाजातील बांडगुळांनो, तुमचा खेळ आता संपला समाज तुम्हाला* *ओळखू लागला आहे* !

*जय* *भीम, जय शिवराय, जय लहुजी* , *जय आदिवासी*

*मातंग समाजातील बांडगुळांनो, तुमचा खेळ आता संपला समाज तुम्हाला* *ओळखू लागला आहे* !

*लेखक, पँथर, पत्रकार चंद्रकांत जगधने*

मी पॅंथर, पत्रकार चंद्रकांत जगधने पँथरच्या आगीत तापलेला, बाबासाहेबांच्या विचाराने घडलेला, आणि मातंग समाजाच्या वेदना छातीत साठवलेला एक सामान्य माणूस. आज मी लिहितोय कारण गप्प बसणं हा आता गुन्हा आहे. आज मला संताप आलाय खोल, जळजळीत, असह्य संताप. कारण माझ्याच मातंग समाजातील काही लोक ज्यांच्या पूर्वजांनी अपमानाचे असंख्य घाव झेलले, ज्यांच्या आजोबांनी माणूस म्हणून जगण्यासाठी रक्त सांडलं तेच आज भाजप-आरएसएसच्या दावणीला बांधले गेले आहेत. स्वतःची खळगी भरण्यासाठी, स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी, स्वतःच्या पोटाची सोय करण्यासाठी हे लोक समाजाला विकत आहेत आणि तोंडाने बोलतात की *आमच्या भाकरीवर* *आमच्याच कष्टाची सही आहे* . हे ऐकलं की छाती फाटते. हे ऐकलं की मनात एकच विचार येतो किती स्वस्तात विकलात स्वतःला? किती स्वस्तात विकला बाबासाहेबांचा वारसा? किती स्वस्तात विकला मातंग समाजाचा इतिहास?

मातंग बांधवांनो, आज मी या बांडगुळांना नावाने हाक मारतो तुम्ही समाजात सोडलेले तितुर आहात. तितुर म्हणजे काय माहीत आहे? शिकारी जंगलात एक तितुर सोडतो तो तितुर इतर पक्ष्यांना जाळ्यात ओढतो, फसवतो, गोड आवाजाने बोलावतो आणि सगळे सापळ्यात अडकतात. हेच काम हे बांडगुळ करत आहेत. भाजप-आरएसएसने यांना मातंग समाजात सोडलं आहे गोड बोलायला, आमिष दाखवायला, समाजाला फोडायला, बाबासाहेबांपासून तोडायला. यांची खळगी भरली जाते समाजाच्या नाशाच्या बदल्यात. यांना पैसे मिळतात समाज विकण्याचे. यांना पद मिळतात समाज फोडण्याचे. आणि हे बांडगुळ हसतमुखाने हे काम करतात कारण यांना समाजाशी काहीही देणेघेणे नाही, यांना फक्त स्वतःची खळगी भरायची आहे.

कष्टाची भाषा करता? ऐका तर मग कष्ट नवीन नाहीत. मातंग समाजाचे पूर्वज हजारो वर्षे राबले. त्यांनी या देशाच्या सीमा सांभाळल्या, गावाचे रक्षण केले, रात्री जागून पहारा दिला, घाम गाळला, रक्त सांडलं. पण तरीही त्यांच्या ताटात भाकर नव्हती, त्यांच्या मुलांना शाळेत बसू दिलं जात नव्हतं, त्यांना माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. का? कारण त्या व्यवस्थेत कष्टाला नाही जातीला किंमत होती. आणि ती व्यवस्था कुणाची होती? त्याच मनुवाद्यांची ज्यांच्या विचाराच्या संघटनेत हे बांडगुळ आज सामील झाले आहेत. आमच्या पूर्वजांना ज्यांनी शतकानुशतके पायदळी तुडवलं, त्यांच्याच दावणीला बांधून हे बांडगुळ समाजाला सांगतात की हाच मार्ग आहे? हीच लाज आहे हाच सर्वात मोठा विश्वासघात आहे.
भाजप-आरएसएस तुम्हाला वापरत आहे हे या बांडगुळांना माहीत आहे पण ते बोलत नाहीत, कारण त्यांची खळगी भरत आहे. यांना माहीत आहे की भाजप-आरएसएसने मातंग समाजासाठी काहीही केलेलं नाही. यांना माहीत आहे की आरक्षण नाकारणाऱ्या विचारांच्या या संघटना आहेत. यांना माहीत आहे की संविधान संपवण्याची भाषा करणारे हेच लोक आहेत. यांना माहीत आहे की बाबासाहेबांच्या विचाराशी या संघटनांचा कट्टर विरोध आहे. हे सगळं माहीत असूनही हे बांडगुळ मातंग समाजाला त्याच जाळ्यात ओढण्याचं काम करतात कारण यांना समाजाची नाही, स्वतःच्या खिशाची चिंता आहे. हे स्वार्थी आहेत, हे बेइमान आहेत, हे समाजद्रोही आहेत आणि मातंग समाजाने यांना ओळखलंच पाहिजे.
मातंग बांधवांनो, या बांडगुळांना कसं ओळखायचं ते मी सांगतो. जे मातंग समाजात राहून बाबासाहेबांच्या विरोधात बोलतात ते बांडगुळ आहेत. जे संविधानाचे फायदे घेऊन संविधानाला नाकारणाऱ्यांचे झेंडे उचलतात ते बांडगुळ आहेत. जे आरक्षणाच्या जोरावर नोकरी मिळवून आरक्षण संपवण्याच्या विचाराच्या पक्षात सामील होतात ते बांडगुळ आहेत. जे समाजात जाऊन गोड बोलतात, आमिष दाखवतात, मतं गोळा करतात आणि मागे जाऊन मनुवाद्यांच्या पायावर लोटांगण घालतात ते बांडगुळ आहेत. जे फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाने सभा घेतात आणि भाजप-आरएसएसच्या एजंडासाठी काम करतात ते बांडगुळ आहेत. यांना ओळखा यांची नावे लक्षात ठेवा यांना समाजात स्थान देऊ नका.

सत्य हे आहे की बाबासाहेब नसते तर मातंग समाजाची काय अवस्था असती? मतदानाचा अधिकार नसता. आरक्षण नसतं. शिक्षणाचा हक्क नसता. सरकारी नोकरीचं स्वप्न नसतं. कामगार कायदे नसते. न्यायालयात जाण्याची हिंमत नसती. आमच्या मुलांनी शाळेत जाण्याचा प्रयत्न केला असता तर मारहाण झाली असती. आमच्या बहिणींनी सन्मान मागितला असता तर अपमान पदरी पडला असता. आजही आमचे पूर्वज जसे राबत होते तसेच राबत राहिलो असतो हक्क नाही, आवाज नाही, ओळख नाही, माणूसपण नाही. बाबासाहेबांनी संविधान लिहून मातंग समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आणि त्याच बाबासाहेबांच्या विरोधात उभे राहण्यासाठी या बांडगुळांनी स्वतःला विकलं आहे हे कधीही माफ करता येणार नाही.

पँथर चळवळीने आम्हाला शिकवलं झुकायचं नाही, तुटायचं नाही, विकायचं नाही. नामदेव ढसाळांनी शिकवलं की आग व्हायला हवं जे जळतं ते जाळतं. राजा ढाळेंनी शिकवलं की सत्य बोलणं हीच क्रांती आहे. आणि त्याच पँथरच्या आगीत घडलेलो त्यांना वाचलेलो मी एक छोटासा कार्यकर्ता आज मातंग समाजाला सांगतो या बांडगुळांना जवळ करू नका. यांच्या गोड बोलण्याला बळी पडू नका. यांचे आमिष स्वीकारू नका. यांना सभेत स्थान देऊ नका. यांना समाजाचे नेते म्हणून मान्य करू नका. कारण जो समाजाला विकतो, तो समाजाचा नेता नसतो तो समाजाचा शत्रू असतो.

मातंग बांधवांनो, आपला इतिहास विसरू नका. आपल्या पूर्वजांनी काय भोगलं ते विसरू नका. मातंग समाजाने किती अपमान सहन केला, किती वेदना झेलल्या, किती संघर्ष केला हे विसरू नका. आणि हे सगळं सहन करताना ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून उभं केलं, ज्यांनी आमच्या हातात हक्काचं कलम दिलं, ज्यांनी आमच्या मुलांसाठी शाळेचं दार उघडलं त्या बाबासाहेबांना विसरू नका. त्यांच्या विचाराशी इमान राखा. फुले-शाहू-आंबेडकरांचा मार्ग सोडू नका. आणि या बांडगुळांना जशास तसे उत्तर द्या सभेत, रस्त्यावर, समाजात, प्रत्येक ठिकाणी. यांचा खेळ उघड करा. यांचा मुखवटा फाडा. यांचं खरं रूप समाजासमोर मांडा.

ही भाकर स्वाभिमानाची आहे, संघर्षाची आहे, क्रांतीची आहे आणि त्या क्रांतीचा मार्ग बाबासाहेबांनी दाखवला आहे. मनुवाद्यांच्या दावणीला बांधलेल्या बांडगुळांनी नाही. म्हणून मी *पँथर पत्रकार चंद्रकांत* *जगधने* मातंग समाजाला आवाहन करतो जागे व्हा, एकत्र व्हा, आंबेडकरी व्हा. बांडगुळांना ओळखा आणि समाजातून हाकला. आपला इतिहास जपा, आपला वारसा जपा, बाबासाहेबांचा विचार जपा हीच आपली खरी भाकर आहे, हाच आपला खरा स्वाभिमान आहे.

*जय भीम! जय मातंग! जय संविधान* !

*लेखक, पॅंथर, पत्रकार चंद्रकांत जगधने*
*मो.7823089822*

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment