logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शेवगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई: सम्राट अशोकनगरमध्ये गोमांस विक्रीवर छापा, २०० किलो मांस जप्त

शेवगाव:
शहरातील सम्राट अशोकनगर भागात एका घराच्या पाठीमागे बेकायदेशीरपणे गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याचा प्रकार शेवगाव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. १५ मे २०२६ रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास टाकण्यात आलेल्या या छाप्यात पोलिसांनी सुमारे २०० किलो गोमांस आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.सम्राट अशोकनगर येथील एका घराच्या पाठीमागे गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विकले जात असल्याची खात्रीशीर माहिती शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने मोहम्मद कैफ फय्याज सौदागर (वय २४, रा. सम्राट अशोकनगर, शेवगाव) याच्या घरावर छापा टाकला.छाप्यादरम्यान घराच्या मागील भागात गोवंश जनावरांचे अवशेष आणि मोठ्या प्रमाणावर कापून ठेवलेले गोमांस आढळून आले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत २०० किलो मांस जप्त केले. यातील २०० ग्रॅम मांस रासायनिक प्रयोगशाळा तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून, उर्वरित मांसाचा पंचांसमक्ष जागेवरच नाश करण्यात आला.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये काही वस्तूंचा समावेश आहे:
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ दिलीप शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८७/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५ आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(ए), ५(बी), ५(सी), ९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आबासाहेब गोरे करत आहेत.
सदरची धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, आजीनाथ कोठाळे तसेच अंमलदार आबासाहेब गोरे, संदीप आव्हाड, शाम गुंजाळ, भगवान सानप, आदिनाथ शिरसाठ, संपत खेडकर, सचिन पिरगळ, ईश्वर बेरड, राजू बडे, प्रशांत आंधळे, तान्हाजी सानप, सूरज भावले, राहुल खेडकर, कृष्णा मोरे, रोहित पालवे आणि मारुती पाखरे यांच्या पथकाने केली.

28
1588 views

Comment