logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

चुरणी येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' उत्साहात संपन्न!

चिखलदरा (प्रतिनिधी):
महसूल विभाग आणि तहसिल कार्यालय, चिखलदरा (जि. अमरावती) यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसामान्यांच्या प्रशासकीय आणि महसुली कामांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा क्रमांक - १)' चे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक आमदार मा. श्री. केवलराम काळे उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मोराणकर साहेब आणि गटविकास अधिकारी यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व संचलन केले.
या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, केवळ महसूल विभागच नव्हे तर तालुक्यातील इतर सर्वच प्रमुख विभागांचे अधिकारी एकाच छताखाली जनतेच्या सेवेसाठी उपस्थित होते. यामुळे नागरिकांची प्रलंबित कामे, विविध दाखले, योजनांचे अर्ज आणि प्रशासकीय समस्यांचे जागीच निवारण करण्यास मोठी मदत झाली.
आमदार केवलराम काळे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनतेची कामे वेळेवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने चिखलदरा परिसरातील अनेक नागरिकांना या समाधान शिबिराचा मोठा फायदा झाला. ग्रामीण भागातील जनतेकडून या लोकाभिमुख उपक्रमाचे मोठे कौतुक केले जात आहे.

5
799 views

Comment