logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*बेकायदा गर्भपात प्रकरणी पुण्याच्या ०२ डॅाक्टरांना अटक*

*बेकायदा गर्भपात प्रकरणी पुण्याच्या ०२ डॅाक्टरांना अटक*

श्रीरामपूर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*)
याबाबत अधिक माहिती अशी की,लोणी पोलीस स्टेशन येथे दाखल असणाऱ्या गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीरपणे गर्भपात प्रकरणाबाबतच्या गुन्ह्यात यापूर्वी एकूण 13 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण 3 डॉक्टर,चार एजंट व सहा संबंधित गर्भवती महिलांचे कुटुंबीय असे एकूण 13 आरोपी अटक आहेत.काल श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर ०२ मधील डॅा.राज शेखला अटक करण्यात आली होती.
दरम्यान गुन्हा करण्यासाठी वापरलेले दोन्ही मशीन हे अटक आरोपींनी पुणे येथील दोघे डॉक्टर 1) डॉ. आकाश सुभाष मलगुंडे,शिरूर,जिल्हा-पुणे 2) डॅा.नीलकंठ अशोक जाधव,लोहगाव,जिल्हा-पुणे व अन्य 1 व्यक्ती 3) नरेंद्र साहेबराव ठाकरे, केशनांदगाव हवेली यांच्याकडून खरेदी केल्याचे तपासात समजले होते.वरील तीनही आरोपींना रात्री उशिरा लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी आणले व त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पूर्वीचे 13 व आज रोजी अटक केलेले तीन असे एकूण 16 आरोपी या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. त्यापैकी पाच डॉक्टर आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम.सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती,लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करत आहेत.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
137 views

Comment