logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लातूर: एल-निनोमुळे खरीप हंगामासाठी सज्जतेवर भर

लातूर: भारतीय हवामान विभागाने २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो'चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवण्याचे निर्देश दिले. त्यांनी शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यावर भर दिला.

पालकमंत्री श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विधान परिषद आमदार प्रतोद विक्रम काळे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बियाणे व खत वितरणात सुसूत्रता राखण्यासाठी तसेच पेरणीसाठी शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करावे, अशी सूचना पालकमंत्री यांनी दिली. याशिवाय वृक्षारोपण व जलसंधारणावरही भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

43
1625 views

Comment