स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
भगवा चौकात उभारले जाणार भव्य अश्वरूढ स्मारक
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
भगवा चौकात उभारले जाणार भव्य अश्वरूढ स्मारक; शिवप्रेमींसह सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुका विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महापराक्रमी, स्वराज्यरक्षक, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य अश्वरूढ स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला आज दि. 14 मे रोजी भगवा चौक, अमळनेर येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिवप्रेमी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला तालुक्याचे माजी आमदार डॉ. बी. एस. आबा पाटील, माजी आमदार शिरीष दादा चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, डॉ. अनिल शिंदे, माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील, मनोहर नाना निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
संभाजी महाराजांच्या भव्य अश्वरूढ स्मारकाचे स्वप्न आज साकारतेय उपनगराध्यक्ष प्रशांत निकम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, नगरपरिषद निवडणुकीदरम्यान त्यांनी शहरातील सर्व प्रभागांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य अश्वरूढ स्मारकाचे आश्वासन दिले होते. आज संभाजी महाराज जयंतीदिनी त्या स्वप्नाच्या भूमिपूजनाचा क्षण अनुभवताना विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या स्मारकासाठी माजी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, नगराध्यक्ष, सर्व सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवक तसेच विविध मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
भगवा चौकात उभारण्यात येणारे हे स्मारक ऐतिहासिक आणि आकर्षक पद्धतीने विकसित करण्यात येणार असून, परिसराला वेगळी ओळख देण्याचा भगवा चौक मित्रमंडळाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या कार्यासाठी नागरिकांकडून उत्स्फूर्त सहकार्य मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इतिहास जपणारी स्मारके तरुणाईसाठी प्रेरणास्थान शिरीषदादा चौधरी
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अमळनेर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात मोठी भर पडली असून, त्या स्मारकामुळे इतिहास आणि स्वाभिमान जिवंत राहिला आहे. त्याच धर्तीवर आता भगवा चौकात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य अश्वरूढ स्मारक उभारले जाणार असून, हे स्मारक भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल.
आजची तरुणाई इतिहासातील पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि बलिदान यांची प्रेरणा अशा स्मारकांतून घेईल, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
संभाजी महाराजांचे विचार समाजाला दिशा देणारे डॉ. बी. एस. आबा पाटील
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. बी. एस. आबा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
संभाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर विद्वान, दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक होते. त्यांच्या विचारांमधून समाजाने प्रेरणा घेण्याची गरज असून, इतिहासाचे स्मरण ठेवणारी स्मारके ही केवळ वास्तू नसून ती समाजाच्या संस्कारांची केंद्रे असतात, असे प्रभावी मत त्यांनी व्यक्त केले.
अमळनेरसारख्या शहरात असे स्मारक उभारले जाणे ही संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे मनोहर नाना निकम
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करताना मनोहर नाना निकम यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य अश्वरूढ पुतळा पूर्णत्वास जाईल, त्या दिवशी अमळनेर तालुक्यातील आजी-माजी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवप्रेमी एकत्र येतील; तो दिवस तालुक्यासाठी सोन्याचा दिवस ठरेल, असे त्यांनी सांगितले.
तालुक्याच्या विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा विरोध न होता सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकीची भावना आवश्यक असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डी. एम. पाटील यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने रंगला कार्यक्रम
कार्यक्रमाचे आकर्षक व ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील यांनी केले. आपल्या प्रभावी निवेदन शैलीत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव करत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यांच्या बहारदार सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमंत्रक तथा उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी केले.
कार्यक्रमाला नगरपालिकेचे पाणीपुरवठा समिती सभापती कैलास नामदेव पाटील, नगरसेवक मोहन भाऊ सातपुते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व नगरसेवक गुलाब पाटील, गटनेते महेश देशमुख, नगरसेवक प्रताप आबा साळी, सुरज परदेशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, संदीप घोरपडे, गोकुळ बोरसे, बन्सीलाल भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, डी. ए. पाटील सर, अशोक बिऱ्हाडे साहेब, अरुण बापू देशमुख, सौ. कविता पवार, प्रा. डॉ. लीलाधर पाटील, प्रा. गणेश पवार, इंजि. दिनकर पाटील (शिरूड), देवेंद्र देशमुख, राजेंद्र देशमुख, आनंद दुसाने साहेब, प्रा. पी. के. पाटील, ठाकरे आबा, गुणवंत पाटील, ज्ञानेश्वर पाटील (एकलहरे), कैलास भोई, संदीप पाटील (इंदवे), एन. के. पाटील (आम आदमी पार्टी), महेश पाटील सर, स्वप्निल पाटील सर, मनोहर सूर्यवंशी सर, मंदार कुलकर्णी, दीपक काटे, देवेंद्र कोठारी, प्रशांत वंजारी, योगेंद्र महाजन, तुषार पवार, पत्रकार उमेश धनराळे, ईश्वर महाजन, अजय भामरे, निकम परिवारातील महेंद्र भाऊ निकम, सौ. सोनल निकम, आदित्य निकम तसेच समस्त भगवा चौक मित्रपरिवार आणि शिवप्रेमी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.