logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नवी मुंबई: 8291920504 व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवेची नागरिकांमध्ये वाढती लोकप्रियता

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8291920504 या क्रमांकावरील व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवेचा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. ही सेवा महानगरपालिकेशी संबंधित विविध कामांसाठी ऑनलाईन सुविधा प्रदान करते, ज्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष महापालिका कार्यालयात जाण्याची गरज नाही. शासनाने अधिसूचित केलेल्या 68 लोकसेवांसह आणखी 45 सेवा या चॅटबॉटवर उपलब्ध असून, एकूण 113 सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत, ज्यात जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आणि बांधकाम परवानगी प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

या चॅटबॉटच्या माध्यमातून मालमत्ता कर, पाणीपट्टी कर देयके ऑनलाईन भरणे शक्य आहे. समाज विकास विभागाच्या 50 हून अधिक लोककल्याणकारी योजनांसाठी एआय सहाय्यक सेवा दिल्या जात आहेत. तसेच, सर्व लोकसेवांचे अर्ज व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असून, मराठी आणि इंग्रजी भाषा पर्याय उपलब्ध आहेत. या सेवेतून 3 लाखाहून अधिक नागरिकांना मालमत्ता कर भरल्याची सूचना दिली गेली आहे. अभय योजना, स्वच्छ सर्वेक्षण आणि जनगणना 2027 संदर्भातील संदेशही मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात आले आहेत. मार्च 2026 पर्यंत 10 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून, केवळ 60 हजार रुपये खर्चात ही सेवा चालवली जात आहे. 7 ते 8 हजार वापरकर्त्यांनी व्हॉट्सपेमेंट लिंकद्वारे देयके भरली असून, 1 लाखाहून अधिक नागरिकांनी मदत घेण्यासाठी चॅटबॉटचा वापर केला आहे.

व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा 24x7 उपलब्ध असून नागरिकांना कार्यालयीन वेळेनंतरही, रात्री किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सेवा मिळते. नागरिकांकडून या सुविधेचा वापर सातत्याने वाढत आहे कारण ती सोपी, कार्यक्षम असून मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. त्यामुळे नवी मुंबईकर नागरिक श्रम, वेळ आणि मूल्याची बचत करत या डिजीटल सेवेचा प्रभावी वापर करत आहेत.

5
425 views

Comment