logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR) व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 'माहिती अधिकार अधिनियम २००५' बाबत जनजागृती

CPR रुग्णालयात 'माहिती अधिकार' जनजागृतीसाठी निवेदन; कार्यकर्ता महासंघाचा पुढाकार
कोल्हापूर: प्रतिनिधी ( 14 )
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR) व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 'माहिती अधिकार अधिनियम २००५' बाबत जनजागृती करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिक व प्रशासन यामध्ये समन्वय साधण्यासाठी एका विशेष निवेदनाचे वाटप करण्यात आले. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने हे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.प्रशासन व नागरिकांमध्ये समन्वय साधण्याचा उद्देशया कायद्याचा मुख्य उद्देश पारदर्शकता आणणे हा आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हक्कांची माहिती व्हावी आणि शासकीय कामकाजात सुलभता यावी, यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यात सुयोग्य समन्वय असणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर महासंघाच्या वतीने सीपीआर रुग्णालयात माहिती अधिकाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूर्द केले निवेदनकोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयाच्या प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात यांची भेट घेऊन त्यांना या मोहिमे संदर्भातील निवेदन दिले. तसेच, दुसऱ्या एका भेटीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भिसे यांनाही सविस्तर निवेदन सुपूर्द करण्यात आले. दोन्ही प्रशासकीय प्रमुखांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.या पदाधिकाऱ्यांची होती उपस्थितीनिवेदन देण्याच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सह संघटक श्री. कृष्णा वरुटे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. शरद पोवार, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. गुंडोपंत सुतार, हातकणंगले तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री. सुरेश जाधव आणि करवीर तालुका पदाधिकारी श्री. संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

0
421 views

Comment