logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्रामाणिकपणाचा विजय: पिंपळे येथील महिलेने परत केले २० तोळे सोने....

प्रामाणिकपणाचा विजय: पिंपळे येथील महिलेने परत केले २० तोळे सोने....

भिगवण: समर्थ न्युज नेटवर्क

सध्याच्या काळात जिथे माणुसकी हरवत चालली आहे, अशा वेळी इंदापूर तालुक्यातील पिंपळे येथील एका महिलेने आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे. रस्त्यावर सापडलेले तब्बल २० तोळे सोन्याचे दागिने मूळ मालकाला परत करून सौ. लता सुनील वाबळे यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे २०२६ रोजी अकोले येथील एक कुटुंब पिंपळे (ता. इंदापूर) येथील श्री पद्मावती देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून घरी परतत असताना त्यांच्याकडून २० तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग चुकून रस्त्यावर पडली. घरी गेल्यावर दागिने गहाळ झाल्याचे लक्षात येताच कुटुंबाने पुन्हा पिंपळे गाठले आणि परिसरात शोध सुरू केला.

याच दरम्यान, पिंपळे येथील रहिवासी सौ. लता सुनील वाबळे यांना सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास रस्त्यावर एक बॅग सापडली होती. त्यामध्ये मौल्यवान दागिने असल्याचे समजताच त्यांनी तात्काळ पदमावती मंदिर परिसरात धाव घेतली. तिथे जमलेल्या लोकांसमोर त्यांनी अकोले येथील मूळ मालक कुटुंबाचा शोध घेऊन त्यांचे दागिने सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले.

सौ. लता वाबळे यांच्या या धाडसी आणि प्रामाणिक कृत्याची दखल घेत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. विनोद महांगडे आणि पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या हस्ते त्यांचा व त्यांचे पती श्री. सुनील हरीबा वाबळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस नाईक निश्चल शितोळे, विठ्ठल वारगड आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. इंदापूर तालुक्यात सध्या या महिलेच्या प्रामाणिकपणाचे मोठे कौतुक होत आहे.

5
186 views

Comment