सिंहस्थ कुंभमेळा लोगो डिझाईन स्पर्धेतील राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचा गौरव....!
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा लोगो डिझाईन स्पर्धेतील राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
पाचोरा प्रतिनिधी
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)दि १३ में २०२६
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा लोगो डिझाईन स्पर्धेतील राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचा गौरव केला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, MyGov India आणि AAAI/ADI यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशभरातून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत स्पर्धकांनी आपल्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला.
स्पर्धेतील मानकरी विजेते :
प्रथम क्रमांक (3 लाख) सुमित काटे, पुणे
द्वितीय क्रमांक (2 लाख) मयंक नायक, नोएडा
तृतीय क्रमांक (1 लाख) पियुष पिंपळनेरकर, पंढरपूर
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य परंपरेला आधुनिक आणि आकर्षक ओळख देणाऱ्या सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन