logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

"बांबरुड(रा) झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी व फळबागाचे नुकसान झाले भरपाई मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले"

"बांबरुड(रा) झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी व फळबागाचे नुकसान झाले भरपाई मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले"
पाचोरा प्रतिनिधी
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)ता .१३ में २०२६
बांबरुड(राणीचे) येथील 11जून 2025 मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी व फळबागांचे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले त्यावेळी गावातील शेतकरी यांनी 12/05/2026 रोजी
मा. किशोर आप्पा पाटील
आमदार पाचोरा-भडगाव,व माननीय पाचोरा तहसीलदार साहेब, यांना निवेदन देण्यात आले निवेदनाद्वारे
देण्यात आले की 11 जून 2025 रोजी बांबरुड राणीचे, ता. पाचोरा येथे मोठ्या प्रमाणात वादळी वारा व पावसामुळे केळी तसेच इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली होती.
त्या वेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, तहसीलदार साहेब, कृषी विभागाचे अधिकारी यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.
यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्यावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाला तात्काळ सूचना करून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करून मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
तसेच 2024 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीतील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
आपण या विषयात तातडीने लक्ष घालून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली त्यावेळी उपस्थिती म्हणून गावातील शेतकरी संभाजी पाटील, मधुकर पाटील, नानाभाऊ वाघ, मनोज वाघ, राकेश कोळी, कैलास चौधरी, सुनील पाटील इतर उपस्थित होते

0
67 views

Comment