logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बांबरुड (राणीचे) विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवीन वास्तूची लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा,

बांबरुड (राणीचे) विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवीन वास्तूची लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा,
पाचोरा प्रतिनिधी
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी )
बांबरूड राणिचे (ता.पाचोरा)दि.१३ मे २०२६
बांबरुड राणीचे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या रेशन दुकानाच्या नूतन व स्वतंत्र लोकार्पण सोहळा आज रोजी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते उद्घाटन; करण्यात आले तसेच पिटीसी चेअरमन नानासाहेब संजय वाघ अध्यक्षस्थानी होते
पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार भाऊसाहेब श्री. दिलीप वाघ यांच्या शुभहस्ते नवीन इमारतीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे (पी.टी.सी.) चेअरमन नानासाहेब श्री. संजय ओंकार वाघ हे होते. यावेळी दगाजी वाघ, माझी पंचायत समिती गटनेता ललित वाघ, प्रदीप वाघ, मनोज वाघ, अनिल पाटील, पिंटू दारकोंडे, खलील देशमुख, बुर्हाण तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या माध्यमातून सभासद व रेशन कार्डधारकांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने स्वतंत्र व प्रशस्त वास्तूची उभारणी करण्यात आली आहे.
व्यासपीठावरील प्रमुख उपस्थिती
या सोहळ्याला संस्थेचे चेअरमन श्री. माणिक विठ्ठल शिंदे, व्हाईस चेअरमन श्री. निवृत्ती शामराव सुर्यवंशी तसेच ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब श्री. रविंद्र मुरलीधर पाटील यांच्यासह संस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होते.
यामध्ये सर्वश्री :
मधुकर ओंकार वाघ
राजेंद्र जयराम जगताप
अशोक रामदास दारकोंडे
ईश्वर सिताराम वाघ
मनोज बंडू कानेटकर
रविंद्र माणीक गोराडे
महारु रामा वडेर
उस्मान कालेखान मेवाती
महादु वना कोकणे
सौ. छाया रविंद्र पाटील
सौ. सुरेखा प्रकाश पाटील
कर्मचारी वर्गाचे विशेष परिश्रम
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आणि नूतन वास्तूच्या नियोजनासाठी संस्थेचे सचिव श्री. राजेंद्र वनाजी सोनार, धान्य दुकान प्रमुख श्री. आनंदा बळीराम साळुंखे, खत विभागाचे श्री. किशोर रमेश पाटील, मुख्य लिपीक श्री. रईस सत्तार पिंजारी तसेच शिपाई श्री. विजय चिंधा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
नवीन व प्रशस्त वास्तूमुळे गावातील नागरिकांना अन्नधान्य वितरण अधिक सुरळीत व वेळेवर होण्यास मदत होईल, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला. कार्यक्रमाला बांबरुड (राणीचे) परिसरातील शेतकरी, विकास सोसायटीचे सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

6
25 views

Comment