logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मंडळाधिकाऱ्यासह पंटरला कोठडी

जळगाव : तक्रारी अर्जाची चौकशी बंद

करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नशिराबादचे मंडळ अधिकारी मिलिंद प्रकाश देवरे (३७, रा. रणछोडदास नगर, जळगांव) व खासगी पंटर सुरेश प्रल्हाद अहिरे (३९, रा. विद्यानगर, पिंप्राळा) या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

१२ मे रोजी पंटरमार्फत लाच घेताना प्रतिबंधक नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. १३ मे रोजी दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

9
429 views

Comment