logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे धाव आशिष धिवार मृत्यूप्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नका; कुटुंबीयांचा संताप

पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे धाव

आशिष धिवार मृत्यूप्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नका; कुटुंबीयांचा संताप

पोलिस, कारागृह व रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास अमरण उपोषणाचा इशारा

केज | प्रतिनिधी

केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथील युवक आशिष ऊर्फ बंटी आशोक धिवार यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वातावरण चांगलेच तापले असून, मृताच्या कुटुंबीयांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. पोलिस कर्मचारी, कारागृह प्रशासन तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर अमानुष वागणूक, मारहाण आणि निष्काळजीपणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मृत आशिषचा भाऊ अभिषेक धिवार यांनी दिलेल्या निवेदनात धक्कादायक आरोप करत म्हटले आहे की, दि. 23 एप्रिल रोजी केज पोलिसांनी आशिषला अटक करताना घरातून फरफटत बाहेर काढले व कुटुंबीयांसमोर बेदम मारहाण केली. पोलिसी खाक्या दाखवतो अशी धमकी देत मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याचबरोबर तपासी अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पैसे न दिल्यास हाल करू अशी धमकी देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयीन कोठडीनंतर आशिषची प्रकृती अचानक बिघडली. त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथेही योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. डॉक्टर व पोलिस गार्डकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अखेर दि. 28 एप्रिल रोजी उपचारादरम्यान आशिषचा मृत्यू झाला.

या संपूर्ण प्रकरणात संबंधित पोलिस कर्मचारी, कारागृह अधिकारी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सहकुटुंब अमरण उपोषण छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे केज तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
35 views

Comment