*अमरनाथ यात्री संघाच्या वतीने आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धर्मभूषण ॲड.दिलीपठाकूरयांच्यानेतृत्वाखाली इंधनबचतशपथघेतली.
(नांदेड : प्रतिनिधी)
*अमरनाथ यात्री संघाच्या वतीने आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली इंधन बचत, स्वदेशीचा वापर, अनावश्यक खर्च टाळणे तसेच देशहित जपण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली.
संकल्प यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे, भारतात सर्वप्रथम असा उपक्रम नांदेड येथे राबविण्यात आला.*
अमरनाथ यात्रा अत्यंत अवघड व खडतर असल्याने यात्रेकरूंना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गेल्या २६ वर्षांपासून सलग तीन महिने दररोज सकाळी नियमित वॉकिंग, ओपन जिममधील व्यायाम तसेच प्राणायाम घेतला जात आहे. शरीरासोबत मनही प्रसन्न राहावे यासाठी दररोज विनोद सांगण्याचाही उपक्रम राबविला जात असून त्यामुळे वातावरणात उत्साह व सकारात्मकता निर्माण होत आहे.यावर्षी यात्रेकरूंची संख्या वाढल्यामुळे ३ व १७ जुलै रोजी दोन वेगवेगळे जथ्थे अमरनाथ यात्रेसाठी रवाना होणार आहेत. संपूर्ण भारतात फक्त नांदेड येथेच यात्रेकरूंची अशा प्रकारे पूर्वतयारी केली जाते, असे आयोजकांनी सांगितले.
बुधवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात सुभाष देवकत्ते यांनी चालण्याचे महत्त्व विषद केले. संजय चौधरी यांनी ऑनलाईन बुकिंगविषयी माहिती दिली. छाया चौधरी यांनी भजन सादर केले, तर साईप्रसाद हळदे यांनी ओपन जिमचे फायदे समजावून सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या राजश्री हुरणे यांचा सत्कार जयश्री ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी दिलीप ठाकूर यांनी उपस्थितांकडून सामूहिक शपथ वदवून घेतली. प्रसंगी मंदाकिनी सुरनर, गौरी व साईप्रसाद देवकत्ते, शर्मिला व प्रशांत होट्टे, वंदना व हनुमानसिंह चौहान, सुचित्रा व प्रल्हादराव नवघरे, कैलाश महाराज वैष्णव, संगीता व प्रशांत जोशी, अन्नपूर्णा व श्यामराव खराणे, सलोना व विजयसिंह चव्हाण, छायाबाई व अशोक दालपे, शोभा व नारायण चव्हाण, राधा व किशन चव्हाण, श्रीकांत अकोलकर, नंदा व भारत चव्हाण, गंगामणी व बजरंग खंदारे, भाग्यश्री व नामदेव पांचाळ, मीरा व जयप्रकाश येवले, मीना व विश्वनाथ झुंजारे तसेच मेधा व रणजीत धर्मापुरीकर यांनी देश प्रथम ही भावना जपत राष्ट्रहितासाठी सदैव कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.
यात्रेकरूंमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून निरोगी शरीर, सकारात्मक मन आणि राष्ट्रभक्तीची भावना या त्रिसूत्रीवर विशेष भर दिला जात आहे.
----
(शीर्षक )
१) मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; अमरनाथ यात्रेकरूंची राष्ट्रहिताची शपथ
२) धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ यात्रेकरूंची सामूहिक प्रतिज्ञा
३) देश प्रथमचा नारा; अमरनाथ यात्रेकरूंनी घेतली राष्ट्रहिताची शपथ
४) मोदींच्या संदेशाने प्रेरित होऊन नांदेडच्या अमरनाथ यात्रेकरूंची प्रतिज्ञा
५) दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून अमरनाथ यात्रेकरूंची देशभक्तीची शपथ
६) अमरनाथ यात्रेपूर्वी यात्रेकरूंनी घेतली राष्ट्रसेवेची सामूहिक प्रतिज्ञा
७) मोदींच्या आवाहनाला नांदेडचा प्रतिसाद; अमरनाथ यात्रेकरूंची शपथ
८) देशहित जपू दिलीप ठाकूर यांच्या उपस्थितीत यात्रेकरूंची प्रतिज्ञा
९) अमरनाथ यात्रेकरूंचा राष्ट्रहित संकल्प; मोदींच्या विचारांना दिला प्रतिसाद
१०) शिस्त, राष्ट्रभक्ती आणि आरोग्याचा संगम; अमरनाथ यात्रेकरूंची प्रेरणादायी शपथ
[13/05, 6:41 pm] *Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwadanagpur-440015