logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*उष्मालाटेचा 'यलो अलर्ट',दक्षता घेण्याचे आवाहन;एकाचा मृत्यू*

*उष्मालाटेचा 'यलो अलर्ट',दक्षता घेण्याचे आवाहन;एकाचा मृत्यू*

अहिल्यानगर (शिवप्रहार न्यूज)- भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार १३ ते १४ मे २०२६ दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली असून "यलो अलर्ट" जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव व पशू-प्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.दरम्यान पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात उष्माघातामुळे काल एका शेतकरी बांधवाचा मृत्यू झाला आहे.
प्रशासनाने नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी काय करावे ? - तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे.तसेच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावे. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी,पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्या.पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा व थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा.
नागरिकांनी काय करू नये ? दुपारी १२.०० ते ०३.०० वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.उन्हात अतिकष्टाचे कामे करू नका.बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.गडद,घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. दारु,चहा,कॉफी व कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.शिळे अन्न खाऊ नका.आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी १०७७,१०२,१०४,१०८ व ११२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
59 views

Comment