कल्याण : एसटी वाहतूक सेवा वेळेवर नसल्याने प्रवाशांची गैरसोय
कल्याण : कल्याण आगारातून सुटणाऱ्या एसटी बस सेवा वेळेवर न चालल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बस उशिरा येणे, फेऱ्या कमी असणे आणि वेळापत्रकाचे पालन न होणे यामुळे विद्यार्थी, कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी संबंधित प्रशासनाला मागणी केली आहे की, एसटी वाहतूक सेवा नियमित, वेळेवर आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्यात यावी. अन्यथा प्रवाशांच्या हितासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही मागणी संघटनेच्या सातारा विभागाकडून करण्यात आली आहे.