logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सुरभि अकॅडमी, फेमिना व यशस्वी ग्रुपचा वाईत प्रशिक्षण केंद्र उद्घाटन

सातारा जिल्हा, वाई: सुरभि अकॅडमी ऑफ स्किल्स, फेमिना आणि यशस्वी ग्रुप यांच्या संयुक्त उपक्रमातून वाई येथे ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रातील युवक-युवतींसाठी भव्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. तेजा काटदरे यांनी ब्युटी अँड वेलनेस क्षेत्रातील रोजगार संधीबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन फेमिना फ्लॉन्ट अकॅडमीच्या माध्यमातून करण्यात आले. हिंदुस्तान युनिलिव्हरचे निवृत्त महाव्यवस्थापक दिलीप काटदरे, फेमिनाच्या ऑपरेशन हेड स्नेहा वासानी, सुरभि अकॅडमीच्या प्रमुख स्वाती हेरकळ, यशस्वी अकॅडमीचे समीर तगारे, अदिती कांबळे आणि वाई केंद्रप्रमुख प्राची हेरकळ उपस्थित होते. या अकॅडमीमध्ये ब्युटी, हेअर, स्किन आणि नेल्स या क्षेत्रातील प्रगत प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षणानंतर रोजगार व व्यवसायासाठी मार्गदर्शन केले जाईल.

8
37 views

Comment