गोंडपिपरी मध्ये चोरट्याची टोळी सक्रिय.. मध्यरात्री पानठेला फोडून सामानाची चोरी.
गोंडपिपरी मध्ये चोरट्याची टोळी सक्रिय..दिनांक 11 मे सोमवार ला माध्यरात्री कमलाताई हॉस्टेल जवळ, साई ढाब्याला लागून असलेल्या पानठेला दिलखुष अलोणे मागील 4 महिन्यापासून चालवत होते. पान ठेला गावाबाजूला असल्याचे पाहून मद्यपी चोरट्यानी दिलखुष अलोणे यांच्या ठेल्यातून 5 हजार रुपये किमतीचे सिगारेट पॅकेटा व 2 हजार रु चिल्लर व रोख रुपये चोरून नेले..
अगोदर ठेल्याच्या मागील बाजूस आरीने कापून टिन तोडला पण पूर्ण टिन न तुटल्याने. चोरट्यानी समोरील ठेल्याचे कुलूप तोडून चोरी केली.. लगेंच सकाळी लक्ष्यात येताच दिलखुस अलोणे नी गोंडपिपरी पोलीस स्टेशन ला तक्रार केली. पुढील तपास करू असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दिलखुष अलोणे नी चोरट्यास पकडण्यासाठी पोलीस प्रसाशनास मागणी करत आहेत