चिकन प्रेमींनो सावधान; राज्यात बर्ड फ्ल्यूचे थैमान नंदुरबार मध्ये आत्तापर्यंत 4 लाख कोंबड्या,21 हजार अंडी केली नष्ट
नंदुरबार नवापूर : बर्ड फ्लूमुळे नंदुरबारच्या नवापूर परिसरातील १२ पोल्ट्री फार्ममध्ये पक्षी मारण्याचा मोठा नाश झाला आहे. आतापर्यंत ३.८९ लाख कोंबड्या, २१.६१ लाख अंडी आणि ४.९९ लाख किलो पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे. या संसर्गाचा प्रादुर्भाव गेल्या महिन्यात डायमंड पोल्ट्री फार्ममध्ये ७० मृत कोंबड्यांमध्ये आढळून आला होता. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करून इतर कोंबड्यांवर औषधोपचार केले, पण मृत्यू थांबला नाही.
रोग अन्वेषण विभाग पुणे आणि राष्ट्रीय उच्चसुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ यांच्याकडून नमुने तपासून बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. त्यानंतर २.४७ लाख कोंबड्या, ९.२७ लाख अंडी आणि २.८६ लाख किलो पशुखाद्य नष्ट करण्यात आले. ४ मे रोजी पुन्हा काही पोल्ट्री फार्ममध्ये संसर्ग आढळल्याने अतिरिक्त नाश झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने नुकसानभरपाईसाठी ९ कोटी रुपयांची मागणी केली असून त्यापैकी ४.५० कोटींचा निधी केंद्र सरकारकडे प्रस्तावित केला आहे.