logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नाशिक येथे दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने इंटरनॅशनल ग्लोबल अवॉर्ड वितरण सोहळा संपन्न

नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (संघ) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड पुरस्कार वितरण सोहळ्याला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. सावित्री कलयुगातली या मराठी चित्रपटाचे निर्माते व अभिनेते कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, समाजसेवक, उद्योजक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
गंगापूर रोड येथील मालोजीराव मोगल कॉलेज सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 60 व्यक्तींना गौरविण्यात आले.
कार्यक्रमात सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सावित्री कलयुगातली या मराठी चित्रपटाचे निर्माते व खलनायक अभिनेते कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्यांचा सत्कार टीव्ही सीरियल अभिनेत्री यांच्या हस्ते केला.
डे केअर स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल दादा पाटील, मा.अशा पाटील ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ,
नूतन महापौर नाशिक मा. हीमगौरी अडके डॉ ज्योती शिंदे मिसेस इंडिया दुबई किशोर उपाध्ये भाजप प्रदेश उपाध्यक्ष इ.अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात अहमदाबाद, गुजरात येथून अतिथी म्हणून उपस्थित असलेले श्री. अशोक कुलकर्णी यांनी विशेष आकर्षण ठरले. यावेळी त्यांचा स्वागत सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारताना श्री. अशोक त्र्यंबक कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (संघ) यांच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार बंधू-भगिनी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, गौरव आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

17
1477 views

Comment