पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून महिलेची २१ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच पिशवीत भरून दिल्या खेळण्यातील नोटा!
पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून महिलेची २१ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच पिशवीत भरून दिल्या खेळण्यातील नोटा!पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेने पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने तिला सिंहगड रस्ता भागात बोलावले. पैसे परत करण्याचा बहाणा करुन पिशवीत लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा भरून दिल्या. नोटांचीयाबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोरखनाथ गावंडकर (रा. कडसुरे, जि. रायगड) याच्याविरुद्ध अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३२ वर्षीय महिला सिंहगड रस्ता भागातील नांदेड सिटी परिसरात राहायला आहे. गेल्या वर्षी महिलेने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. आरोपीने विवाहविषयक संकेतस्थळावरुन महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने विवाहाचे आमिष दाखवून महिलेला जाळ्यात ओढले. आर्थिक अडचणीत असल्याची बतावणी करुन महिलेकडून वेळोवेळी २१ लाख रुपये घेतले. महिलेने पैसे करण्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने पैसे परत करतो, असे सांगून महिलेला सिंहगड रस्ता परिसरात भेटायला बोलाविले. पिशवी महिलेला देऊन आरोपीला
सबस्क्राईब करा
Subscribe at Rs 799
लोकसत्ता सविस्तर
लोकसत्ता प्रीमियम
धीरेंद्र कृष्ण शास्त्री
IPL 2026
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
Marathi News
pune
pune matrimonial fraud case woman cheated 21 lakh toy notes pune print news rak
Matrimonial Fraud Pune : पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून महिलेची २१ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच पिशवीत भरून दिल्या खेळण्यातील नोटा!
पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख करून लग्नाचे आमिष दाखवत एका भामट्याने महिलेची २१ लाख रुपयांची फसवणूक केली.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
May 11, 2026 17:34 IST
Follow Us
Matrimonial fraud case in Pune Singhagad Road | लग्नाचे आमिष दाखवून महिलेची २१ लाखांची फसवणूक | Accused returned toy notes in Pune fraud case | पुण्यातील विवाहविषयक संकेतस्थळ फसवणूक प्रकरण
पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून महिलेची २१ लाखांची फसवणूक (फोटो- एआय जनरेटेड)
पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेने पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने तिला सिंहगड रस्ता भागात बोलावले. पैसे परत करण्याचा बहाणा करुन पिशवीत लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा भरून दिल्या. नोटांची पिशवी महिलेला देऊन आरोपीला पसार झाला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोरखनाथ गावंडकर (रा. कडसुरे, जि. रायगड) याच्याविरुद्ध अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३२ वर्षीय महिला सिंहगड रस्ता भागातील नांदेड सिटी परिसरात राहायला आहे. गेल्या वर्षी महिलेने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. आरोपीने विवाहविषयक संकेतस्थळावरुन महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने विवाहाचे आमिष दाखवून महिलेला जाळ्यात ओढले. आर्थिक अडचणीत असल्याची बतावणी करुन महिलेकडून वेळोवेळी २१ लाख रुपये घेतले. महिलेने पैसे करण्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने पैसे परत करतो, असे सांगून महिलेला सिंहगड रस्ता परिसरात भेटायला बोलाविले.
आरोपी आणि महिला एका हॉटेलमध्ये भेटले. तेथे त्याने महिलेला लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा एका पिशवीत भरून दिला. महिलेने पिशवी उघडून पाहिली नाही. आरोपी तेथून पसार झाला. काही वेळानंतर महिलेने पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीत खेळण्यातील नोटा भरून दिल्याचे उघडकीस आले. महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाणटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, सहायक निरीक्षक कदम तपास करत आहेत.
एटीएममधून पैसे काढणाऱ्या मुलाची एक लाखांची फसवणूक
एटीएममधून पैसे काढणाऱ्या मुलाला मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्याने खात्यातून एक लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली. खडकीतील ओैध रस्ता परिसरातील एका बँकेच्या एटीएमजवळ रविवारी ही घटना घडली. पसार झालेल्या चोरट्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४७ वर्षीय महिला ओैंध रस्ता परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. त्यानंतर महिलेने मुलाला त्यांच्याकडील एटीएम कार्ड दिले. अंत्यविधीसाठी पैसे लागतील. एटीएममधून पैसे काढून ये, असे त्यांनी मुलाला सांगितले. त्यानंतर मुलगा सकाळी साडेनऊच्या सुमारास ओैंध रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएम परिसरात गेला. एटीएमच्या परिसरात चोरटा थांबला होता. मुलगा एटीएममध्ये गेल्यानंतर चोरटा आत शिरला.पसार झाला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला.