डमी ग्राहकाने इशारा केला अन् लॉजवरील कुंटणखाना उघड
जळगाव : मुख्य बाजारपेठेचा परिसर
असलेल्या टॉवर चौकातील उपाध्ये लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर एलसीबी व एएचटीयूच्या पथकाने कारवाई करीत एका महिलेची सुटका केली. यात कुंटणखाना चालविणारा राजू मोतीराम जोशी (४५, मूळ रा. मल्लाराता सेमारी, जि. सलुंबर, राजस्थान, ह.मु उपाध्ये लॉज) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ९ मे रोजी करण्यात आली.
टॉवर चौकातील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.
त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (एएचटीयू) यांचे पथक तयार करून डमी ग्राहक पाठविला. डमी ग्राहकाने तेथे पोहचल्यानंतर पैशाची बोलणी करून इशारा केला व पथक आत पोहचले