logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

धावत्या गाडीत आईने दिला बाळाला जन्म; पुणे-सुपौल एक्सप्रेसच्या जनरल डब्यात नेमके काय घडले

धावत्या गाडीत आईने दिला बाळाला जन्म; पुणे-सुपौल एक्सप्रेसच्या जनरल डब्यात नेमके काय घडलेपुणे : एक्सप्रेस गाडीचा जनरल डबा, प्रवाशांची भरमसाठ गर्दी आणि अचानक एका गर्भवती महिलेला सुरू झालेल्या तीव्र प्रसूती कळा एखाद्या सिनेमात शोभेल अशी थरारक घटना पुणे-सुपौल एक्सप्रेसमध्ये नुकतीच घडली. धावत्या गाडीत एका गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला.पुणे रेल्वे स्थानकावरून बिहारमधील सुपौलकडे जाणारी पुणे-सुपौल एक्सप्रेस नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळच्या सुमारास सुटली. या गाडीत मूळच्या उत्तर प्रदेशातील रहिवासी रोक्साना खातून (वय २८) आणि त्यांचे पती जमील बेलावर जनरल डब्यातून प्रवास करत होते. ते उत्तर प्रदेशमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय स्थानकावर उतरणार होते. पण, घडले उलटेच. रोक्साना खातून गर्भवती होत्या. रात्री उशिरा गाडी अहिल्यानगर स्थानकाच्या जवळ येत असताना अचानक रोक्साना यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. गाडी प्रचंड वेगाने धावत होती. त्यात जनरल डब्यातील प्रवाशांच्या भरमसाठ गर्दीने दोघा पती-पत्नीला काय करावे सुचेनासे झालेले. रोक्साना यांच्या किंकाळ्यांनी डब्यातही तणावाचे वातावरण निर्माण झालेले.

ऑपरेशन मातृशक्ती
या सगळ्या प्रकाराची माहिती मिळताच मध्य रेल्वेकडून ऑपरेशन मातृशक्ती राबवण्यात आले. अहिल्यानगर पोस्टचे कॉन्स्टेबल सोमनाथ पाठाडे आणि हेड कॉन्स्टेबल विश्वजीत काकडे यांनी विलंब न लावता जनरल डब्याकडे धाव घेतली. पण, प्रसूती वेदना इतक्या तीव्र होत्या की, त्या महिलेला बाहेर काढणे, जागेवरून हलवणे अशक्य होते. हातात वेळ कमी होता आणि रुग्णालयही बऱ्याच अंतरावर होते. अशा वेळी प्रसंगावधान ओळखून डब्यातील महिला प्रवाशांच्या मदतीने डब्यातच प्रसुतीसाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यात आले. अखेर, रोक्साना यांनी धावत्या गाडीत, जनरल डब्यात बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाच्या रडण्याने डब्यातील तणाव काही प्रमाणात कमी झाला. पण, अनेक आव्हाने समोर होती.सबस्क्राईब करा
Subscribe at Rs 799
लोकसत्ता सविस्तर
लोकसत्ता प्रीमियम
धीरेंद्र कृष्ण शास्त्री
IPL 2026
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
Marathi News
pune
pregnant woman gives birth pune supaul express railway police operation matrushakti ahilyanagar pune print news ssb
धावत्या गाडीत आईने दिला बाळाला जन्म; पुणे-सुपौल एक्सप्रेसच्या जनरल डब्यात नेमके काय घडले ?
एक्सप्रेस गाडीचा जनरल डबा, प्रवाशांची भरमसाठ गर्दी आणि अचानक एका गर्भवती महिलेला सुरू झालेल्या तीव्र प्रसूती कळा
Written by लोकसत्ता टीम
May 11, 2026 03:16 IST

Follow Us
pregnant woman delivery in pune supaul express | railway police operation matrushakti ahilyanagar | central railway police help pregnant lady | maharashtra railway news today
धावत्या गाडीत आईने दिला बाळाला जन्म; पुणे-सुपौल एक्सप्रेसच्या जनरल डब्यात नेमके काय घडले ? (छायाचित्र सौजन्य - लोकसत्ता टीम)
पुणे : एक्सप्रेस गाडीचा जनरल डबा, प्रवाशांची भरमसाठ गर्दी आणि अचानक एका गर्भवती महिलेला सुरू झालेल्या तीव्र प्रसूती कळा एखाद्या सिनेमात शोभेल अशी थरारक घटना पुणे-सुपौल एक्सप्रेसमध्ये नुकतीच घडली. धावत्या गाडीत एका गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला.

पुणे रेल्वे स्थानकावरून बिहारमधील सुपौलकडे जाणारी पुणे-सुपौल एक्सप्रेस नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळच्या सुमारास सुटली. या गाडीत मूळच्या उत्तर प्रदेशातील रहिवासी रोक्साना खातून (वय २८) आणि त्यांचे पती जमील बेलावर जनरल डब्यातून प्रवास करत होते. ते उत्तर प्रदेशमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय स्थानकावर उतरणार होते. पण, घडले उलटेच. रोक्साना खातून गर्भवती होत्या. रात्री उशिरा गाडी अहिल्यानगर स्थानकाच्या जवळ येत असताना अचानक रोक्साना यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. गाडी प्रचंड वेगाने धावत होती. त्यात जनरल डब्यातील प्रवाशांच्या भरमसाठ गर्दीने दोघा पती-पत्नीला काय करावे सुचेनासे झालेले. रोक्साना यांच्या किंकाळ्यांनी डब्यातही तणावाचे वातावरण निर्माण झालेले.

ऑपरेशन मातृशक्ती
या सगळ्या प्रकाराची माहिती मिळताच मध्य रेल्वेकडून ऑपरेशन मातृशक्ती राबवण्यात आले. अहिल्यानगर पोस्टचे कॉन्स्टेबल सोमनाथ पाठाडे आणि हेड कॉन्स्टेबल विश्वजीत काकडे यांनी विलंब न लावता जनरल डब्याकडे धाव घेतली. पण, प्रसूती वेदना इतक्या तीव्र होत्या की, त्या महिलेला बाहेर काढणे, जागेवरून हलवणे अशक्य होते. हातात वेळ कमी होता आणि रुग्णालयही बऱ्याच अंतरावर होते. अशा वेळी प्रसंगावधान ओळखून डब्यातील महिला प्रवाशांच्या मदतीने डब्यातच प्रसुतीसाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यात आले. अखेर, रोक्साना यांनी धावत्या गाडीत, जनरल डब्यात बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाच्या रडण्याने डब्यातील तणाव काही प्रमाणात कमी झाला. पण, अनेक आव्हाने समोर होती.

हेही वाचा
Land Titling Act Maharashtra : लँड टायटलिंग ॲक्टची राज्यात जुलैपासून अंमलबजावणी; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
आई आणि बाळ दोघेही सुखरूप
नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आणि रोक्साना यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळवून देणे गरजेचे होते. रेल्वे पोलीसांनी गाडी स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच अहिल्यानगर स्थानकातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. फलाटावर रुग्णवाहीका सज्ज ठेवण्यात आली. गाडी थांबताच आई आणि नवजात बाळाला अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान डॉ. प्रदीप सुवरशे आणि रुग्णवाहिका चालक मयूर बोले यांनी सहकार्य केले. सध्या आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शेवटी, पत्नी आणि बाळाचे प्राण वाचवल्याबद्दल जमील बेलावर यांनी रेल्वे पोलीसांचे आभार मानले.

2
0 views

Comment