logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पोलिस भरतीत निवड झालेल्या युवतीचा आदिवासी टायगर सेनेकडून सत्कार.

प्रतिनिधी : आकाश गेडाम

समाजातील युवक-युवतींना प्रेरणा मिळावी आणि शासकीय सेवेकडे त्यांचा कल वाढावा या उद्देशाने आदिवासी टायगर सेना यांच्या वतीने पोलिस भरतीमध्ये यश संपादन करून नियुक्ती मिळविलेल्या युवती साक्षी रमेश कडते हिचा गोजोली येथे तिच्या राहते घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तिच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
सदर युवतीने कठीण परिस्थितीतही हार न मानता सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मेहनतीच्या जोरावर पोलिस भरतीत यश मिळविले. तिच्या या यशामुळे परिसरातील अनेक युवक-युवतींना प्रेरणा मिळणार असून समाजासाठी ही अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात कराटे मास्टर तथा तालुका संघटक आदिवासी टायगर सेना संघटक कुंदन पेंदोर यांनी युवकांनी स्वतःमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि मेहनतीची तयारी ठेवली तर कोणतेही यश अशक्य नसल्याचे सांगितले. गणेश कोवे यांनी ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवेत पुढे येणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विदर्भ पदाधिकारी विदर्भ प्रवक्त्या मनिषा मडावी यांनी संघटनेमार्फत युवक-युवतींना नेहमी मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. उपनगराध्यक्षा गोंडपिपरी सारिका मडावी, तालुका महासचिव गोवर्धन आत्राम यांनी पण मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी युवतीचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थितांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
सत्कार कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, गावकरी तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

53
7500 views

Comment