वाशी महापालिका रुग्णालयात रुग्णांच्या अन्नात जिवंत अळ्या आढळल्या; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
वाशी महापालिका रुग्णालयात रुग्णांच्या अन्नात जिवंत अळ्या आढळल्या; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
दि. ३ मे २०२६ रोजी सेक्टर १०-अ येथील महापालिका रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील महिला अस्थिरोग विभागातील रुग्णांना देण्यात आलेल्या लापशीमध्ये जिवंत अळ्या आढळून आल्या.
आधीच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेनंतर संबंधित अन्न ताब्यात घेण्यात आले असले, तरी पुरावे देण्यास टाळाटाळ व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
दि. ५ व ६ मे २०२६ रोजी या प्रकरणाबाबत महापालिका प्रशासन व आरोग्य विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणात संबंधित अन्नपुरवठादार कंत्राटदार, जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत वैज्ञानिक