logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

100 टक्के अंध विद्यार्थिनीचे घवघवीत यश

चंद्रपूर प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे आयोजित एसएससी बोर्ड परीक्षेत शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा, बोर्डा, जिल्हा चंद्रपूर येथील विद्यार्थिनी निधी संतोष सोनवाणे हिने 83.40 टक्के गुण संपादन करून उल्लेखनीय यश मिळवले आहे.

विशेष बाब म्हणजे निधी ही विद्यार्थिनी 100 टक्के दृष्टिहीन (अंध) असूनही तिने जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शाळेसह परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

निधी हिने मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट या विषयांमध्ये उत्कृष्ट गुण प्राप्त केले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आवड कायम ठेवत तिने इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामदास खवशी यांनी विद्यार्थिनीचे विशेष अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही निधीचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

3
621 views

Comment