चैताली पोतराजे हिचा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा.
प्रतिनिधी/ आकाश गेडाम
पोंभुर्णा - तालुक्यातील मोहाळा येथील कु. चैताली संजय पोतराजे यांनी पोलीस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय ho यश संपादन करत जालना पोलीस दलात निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण मोहाळा गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांकडून तसेच नातेवाईकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
मोहाळा गावातील पहिली पोलीस महिला म्हणून चैताली पोतराजे यांनी मिळवलेले हे यश गावासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चैताली यांच्या यशाबद्दल दौलत आत्राम, वर्षा आत्राम (विदर्भ संघटिका, आदिवासी टायगर सेना), सुजाता कारेकर (उपसरपंच, मोहाळा), कुंदन पेंदोर (कराटे मास्टर, खराडपेठ), शारदा पिदुरकर आणि रवीना मडावी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
गावकऱ्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, चैताली पोतराजे यांचे यश हे केवळ त्यांच्या परिवारासाठी नव्हे तर संपूर्ण गावासाठी गौरवास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे गावातील अनेक युवक-युवतींना प्रेरणा मिळत असून शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची ऊर्जा मिळाली आहे.
पोलीस दलात कार्यरत राहून चैताली यांनी प्रामाणिकपणे समाजसेवा करावी आणि गावाचे नाव आणखी उज्ज्वल करावे, असा विश्वासही गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.