logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भूखंडाच्या आमिषाने ५७ लाखांची फसवणूक

भूखंड विकत देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने १५ गुंतवणूकदारांकडून तब्बल ५७ लाख ३६ हजार रुपये उकळले. त्यांना प्लॉट अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीबीडी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी तेजस डांगे व त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणातील टोळीने जून २०२२ मध्ये सीबीडी परिसरात मे. लँडलाइन्स रिअलटर्स या कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी उरण तालुक्यातील वाशवे, वेशणी व पुनाडे या भागातील मोकळे प्लॉट विकत देण्याची जाहिरातबाजी केली होती. या जाहिरातबाजीला भुलून अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीकडे धाव घेतली. आरोपींनी या गुंतवणूकदारांकडून प्लॉटच्या मोबदल्यात मोठी रक्कम घेतली. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी प्लॉटचा ताबा दिला नाही आणि गुंतवणूकदारांचे पैसेही परत केले नाहीत.

या प्रकरणात फसवणूक झालेल्यांमध्ये पुष्करसिंग रावत यांच्यासह प्रवीण चंद्रशेखर, प्रदीप भाटकर, सुनील वाडकर, कांतीलाल पटेल, गौरव वर्सोलेकर, राजिंदर सिंह, हफीज अन्सारी, मनोज होळकर, नानी मंडल, तुकाराम देपे, सचिन शाहाणे, सुनील शेट्टी व इतरांचा समावेश आहे. या सर्वांना मिळून ५७ लाख ३६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला असून या १५ गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

5
2443 views

Comment