logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लोणीतील भैरवनाथ विद्यालयाचा दहावी निकाल उज्वल; गुणवंत विद्यार्थ्यांनी राखली यशाची परंपरा.

लोणी, प्रतिनिधी : तेजस वाळुंज

आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री भैरवनाथ विद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवत संस्थेचा नावलौकिक अधिक वाढवला.
यावर्षी घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यालयातील ४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४५ विद्यार्थ्यांनी यश मिळवत शाळेचा निकाल समाधानकारक लागला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य आणि प्रथम श्रेणीत यश संपादन केले.
विद्यालयाच्या या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. निकाल जाहीर होताच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणीच्या वतीनेही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे लोणी परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात श्री भैरवनाथ विद्यालयाने पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे.

9
1129 views

Comment