logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पाच लाखांची लाच घेताना 'सा.बां.'चा अभियंता जाळ्यात

जळगाव : रस्त्याच्या कामाच्या बिलाची रक्कम अदा करण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराकडून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता (वर्ग २) योगेश अभिमन्यू अहिरे (वय: ४४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी (९ मे) पकडले.

तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे ८० लाख ३९ हजार ७४२ रुपयांचे काम सन २०२४ मध्ये घेतले होते. हे काम पूर्ण केल्यानंतर

वरिष्ठांच्या नावे निम्मे रक्कम

लाचेविषयी तक्रारदारांनी ५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अहिरे यांनी तडजोडअंती १५ लाख रुपये घेण्याचे ठरले. त्यामध्ये स्वतःसाठी सात लाख ५० हजार तर उर्वरित रक्कम त्यांच्या वरिष्ठांच्या नावे मागितली होती.

एकूण रकमेपैकी तक्रारदार यांना अंदाज ५८ लाख रुपयांचे बिल मंजूर झाले होते, तर उर्वरित ३८ लाख ४९ हजार ७४२ रुपये अद्यापपर्यंत मिळाले नव्हते.. त्यासाठी १८ लाख रुपयांची मागणी केली होती.

2
1180 views

Comment