*श्रीरामपूर कोर्टाकडून त्याप्रकरणी 03 वर्षे कारावास नाही तर बंधपत्राची शिक्षा*...
*श्रीरामपूर कोर्टाकडून त्याप्रकरणी 03 वर्षे कारावास नाही तर बंधपत्राची शिक्षा*...
श्रीरामपूर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क* ) याबाबत अधिक माहिती अशी की,तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 140/2022 भारतीय दंड विधान संहिता कलम 324, 323, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी नामे नवनाथ अशोक जाधव यांस आरोपी नामे 1) शिवाजी शंकर वने, 2) शंकर बाबुराव वने, 3) चैतन्य दिलीप वने,सर्व रा. भेर्डापुर, ता. श्रीरामपुर जि.अहिल्यानगर यांनी मागील वादाच्या कारणावरुन इंडियन ऑईल पेट्रोलपंप भेर्डापुर, ता.श्रीरामपूर येथे लोखंडी हातोडा व विटाने मारहाण करुन,शिवीगाळ दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिलेली होती.
वर नमुद गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे तपासी अंमलदार सफौ.अर्जुन भैरु बाबर,श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे यांनी गुन्ह्याचा तपास करुन आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.न्यायालयाने या खटल्यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी व तपासी अंमलदार यांच्या साक्ष नोंदवुन घेवुन वरील आरोपी यांना दोषी ठरवुन विजया काटकर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीरामपुर यांनी *03 वर्षे चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र व 75,000/- दंड भरपाई तसेच सदर बंधपत्राचे उल्लंघन केल्यास 03 वर्ष कारावासाची शिक्षा* सुनावलेली आहे.
सदर केस मध्ये सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती आर.पी.धुमाळ,तपासी अंमलदार अर्जुन बाबर व कोर्ट पैरवी अधिकारी शेख श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन यांनी कामकाज पाहिलेले आहे.
दरम्यान समाज माध्यमातून शेअर झालेल्या एका प्रेस नोट मध्ये ०३ वर्षे कारावासाची शिक्षा असा उल्लेख आल्याने अनेक वृत्तपत्रे व ॲानलाईन मेडीयानी त्याप्रमाणे बातमी केली परंतू आता सुधारित प्रेस नोट आली असुन त्यामध्ये 03 वर्षे चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र व 75,000/- दंड भरपाई तसेच सदर बंधपत्राचे उल्लंघन केल्यास ०३ वर्ष कारावासाची शिक्षा असा सुधारणा झालेला उल्लेख आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015